अमेझॉनची ऑडिओ बुक सेवा भारतात सादर

0
amazon-audible-audio-book-service

अमेझॉनने आपली ऑडिबल ही ऑडिओ बुक सेवा भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून याला एक महिन्यापर्यंत मोफत वापरता येणार आहे.

जगभरात ऑडिओ बुक्स लोकप्रिय होत आहेत. भारतात हा प्रकार फारसा प्रचलीत नसला तरी एका वर्गाला ऑडिओ बुक्स भावत असल्याचे आधीच अधोरेखीत झाले आहे. या अनुषंगाने अमेझॉन कंपनीने आपली ऑडिबल ही सेवा भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत ग्राहक त्याला हवे असणारे ऑडिओ बुक ऐकू शकणार आहे. ही सेवा एक महिन्यापर्यंत अगदी मोफत वापरता येणार आहे. यानंतर यासाठी १९९ रूपये प्रति-महिना इतक्या दराने आकारणी करण्यात येणार आहे. सहा महिन्यांसाठी याला १,३४५ तर बारा महिन्यांसाठी २,३३२ रूपये लागणार आहेत.

अमेझॉनच्या ऑडिबल सेवेच्या अंतर्गत सध्या सुमारे दोन लाख ऑडिओ बुक्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यात अनेक इंटरनॅशनल बेस्ट सेलर्सचा समावेश आहे. यामध्ये लवकरच भारतीय पुस्तकांचाही समावेश करण्यात येणार असल्याची माहिती अमेझॉनतर्फे देण्यात आलेली आहे. ऑडिबल ही सेवा अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. एका अ‍ॅपच्या माध्यमातून याचा वापर करता येणार आहे. याशिवाय, याला अमेझॉनच्या इको हा स्मार्ट स्पीकर्ससोबतही संलग्न करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here