अमेझॉनच्या इको मालिकेत तीन नवीन स्मार्ट स्पीकर

0
अमेझॉन इको, Amazon-Echo-Dot-Echo-Plus-and-Echo-Sub

अमेझॉनने आपल्या इको मालिकेत तीन नवीन स्मार्ट स्पीकर भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून यात आधीपेक्षा अद्ययावत फिचर्स देण्यात आले आहेत.

अमेझॉनने इको डॉट, इको प्लस आणि इको सब हे तीन नवीन स्मार्ट स्पीकर भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे ४,४९९; १४,४९९ आणि १२,९९९ रूपये इतके आहे. यातील इको डॉट आणि इको प्लस हे आधी याच नावाने उपलब्ध असणार्‍या मॉडेलची नवीन आवृत्ती आहे. तर इको सब हे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. या तिन्ही मॉडेल्सची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. यातील इको डॉट आणि इको प्लस हे स्पीकर पुढील महिन्यात तर इको सब हे मॉडेल यानंतर ग्राहकांना प्रत्यक्षात मिळणार आहे. या तिन्हीमध्ये अमेझॉनच्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्याला हवी ती ध्वनी आज्ञावली (व्हाईस कमांड) देऊन विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात ताज्या बातम्या, हवामानाचे अलर्ट, संगीत आदींना ऐकता येणार आहे. तर याच्याशी कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करणे अथवा रिसीव्ह करणे आदी फंक्शन्सही यावरून वापरता येणार आहेत.

अमेझॉन इको डॉट या मॉडेलमध्ये नवीन डिझाईन देण्यात आले आहे. यासाठी यात नवीन फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे. याचा आकार गोलाकार असून हे मॉडेल तीन रंगाच्या पर्यायात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याला होम थिएटर अथवा अन्य प्रणालीस ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यात ऑडिओ जॅकदेखील दिलेले आहे.

अमेझॉन इको प्लस या मॉडेलमध्ये टेंपरेचर सेन्सर हे इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेले आहे. यामुळे तापमानाशी संबंधीत विविध स्मार्ट होम अप्लायन्सेशी याला कनेक्ट करता येणार आहे. यामुळे समजा युजरने आपल्या घरातील तापमान हे ३३ अंशाच्या वर गेल्यानंतर आपोआप एयर कंडिशनर सुरू करण्याची व्यवस्था करता येणार आहे. याच पध्दतीने याला घरातील विविध उपकरणे संलग्न करता येतील. यातील स्पीकर आणि मायक्रोफोन अतिशय दर्जेदार आहेत. यालाही तीन रंगाच्या पर्यायात खरेदी करता येणार आहे. तर, अमेझॉन इको सब या स्मार्ट स्पीकरमध्ये अतिरिक्त सब-वुफर देण्यात आलेले आहे. याची क्षमता तब्बल १०० वॅट इतकी आहे. यात इक्वलायझरदेखील देण्यात आलेले आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्याला हव्या त्या प्रकारात संगीत ऐकू शकणार आहे.

स्मार्ट स्पीकरच्या बाजारपेठेत गुगलने जोरदार मुसंडी मारलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आपल्या या इको मालिकेतील नवीन मॉडेल्सच्या माध्यमातून अमेझॉनने गुगलला आव्हान देण्याची तयार केल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here