सिएटल- आघाडीची ई-कामॅर्स कंपनी असणार्या अमेझॉनने आपल्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर आज अपलोड केलेल्या व्हिडीओतून नव्या प्रॉडक्टविषयी संकेत दिल्याने याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमेझॉन अनेक दिवसांपासून एका अनोख्या प्रकल्पावर काम करत असल्याची माहिती याआधीच समोर आली होती. यातच आज कंपनीच्या यु-ट्युबवरील अधिकृत चॅनलवर एका नवीन उत्पादनाविषयी गुढरम्य पध्दतीने उत्सुकता ताणण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अमॅझॉनचा हा स्मार्टफोन असण्याची शक्यता असून यात जगात प्रथमच होलोग्राफीक थ्री-डी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे विशिष्ट चष्म्याविनादेखील यात त्रिमीतीय प्रतिमा स्मार्टफोनधारकाला दिसू शकणार आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे १८ जून रोजी सिएटलमध्ये हे प्रॉडक्ट लॉंच करणार आहेत.