अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवा आता हिंदीत

0

अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवेचा युजर इंटरफेस आता हिंदीत सादर करण्यात आला असून यामुळे युजर्सची सोय होणार आहे.

अमेझॉनची ऑन-डिमांड या प्रकारातील सेवा असणार्‍या प्राईम व्हिडीओचा युजर इंटरफेस आता हिंदीत सादर करण्यात आला आहे. खरं तर या सेवेवर हिंदी भाषेतील मनोरंजनाता अजस्त्र खजिना आधीपासूनच उपलब्ध असला तरी नेव्हीगेशन मेन्यूसह सर्व बाबी या इंग्रजीतच असल्यामुळे युजर्सची कुचंबणा होत होती. विशेष करून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांमधील युजर्सला इंग्रजीची अडचण येत असल्यामुळे ही समस्या उदभवली होती. या पार्श्‍वभूमिवर, आता प्राईम व्हिडीओ या सेवेचा युजर इंटरफेस हा हिंदी भाषेतही उपलब्ध करण्यात आला आहे. यात नेव्हीगेशन मेन्यूतील विविध माहितीदेखील आता हिंदीत पाहता येणार आहे. याशिवाय, सर्च, कस्टमर सपोर्ट आदींमध्येही हा बदल करण्यात आलेला आहे. यामुळे कोणत्याही व्हिडीओचे शिर्षक आणि त्याचे विवरणदेखील हिंदीत वाचता येईल. हा बदल https://www.primevideo.com आणि अमेझॉन प्राईम अ‍ॅप या दोन्हींवर करण्यात आला आहे. अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी याला सादर करण्यात आले आहे. हिंदी भाषेसाठी युजरला सेटींगमध्ये जाऊन भाषेचा प्रेफरन्स निवडावा लागणार आहे. यामध्ये एकदा हिंदीची निवड केल्यानंतर हा बदल सेव्ह होणार आहे. अर्थात, याला वारंवार निवडण्याची आवश्यकता भासणार नाही.

भारतीय बाजारपेठेत ऑन-डिमांड व्हिडीओ सेवेच्या क्षेत्रात सध्या खूप चुरस सुरू आहे. विशेष करून नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असून यात काही भारतीय कंपन्यांनीही उडी मारली आहे. या पार्श्‍वभूमिवर, ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याची धडपड सुरू झाली आहे. या अनुषंगाने अमेझॉनने हिंदी भाषेचा देऊ केलेला सपोर्ट हा लक्षणीय मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here