अल्प दरात इंटरनॅशनल कॉल

0

अल्प दरात इंटरनॅशनल कॉल करण्याची सुविधा असणारे रिंगो हे ऍप्लीकेशन भारतातही सादर करण्यात आले आहे.

ringo

इंटरनेच्या मदतीने मोफत वा अल्प मुल्यात कॉल करण्याची सुविधा प्रदान करणारे अनेक ऍप्लीकेशन्स आहेत. मात्र यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. परिणामी याचा वापर करतांना इंटरनेटच्या गतीप्रमाणे आवाजाची क्वालिटी बदलू शकते. याचसोबत मोबाईल कंपन्यांना डाटा चार्जेसही द्यावा लागतो. या पार्श्‍वभुमीवर ‘रिंगो’ हे ऍप्लीकेशन अगदी अनोखे असे आहे.

‘रिंगो’चा वापर करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागते. सद्यस्थितीत हे ऍप अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोज या तिन्ही प्रणालींवर उपलब्ध आहे. ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला पहिला कॉल अगदी मोफत करावा लागतो. यानंतर संबंधीत कंपनीकडून प्रीपेड रिचार्जप्रमाणे ‘क्रेडिट’ खरेदी करावे लागते. यानंतर आपण जगभरात कुठेही मोबाईल वा लँडलाईनवर कॉल करू शकतो. याचे दर अन्य कंपन्यांच्या एक चतुर्थांश वा त्यापेक्षाही कमी आहेत. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये अन्य कंपन्यांचा दर आठ रूपये प्रति मिनिट असतांना ‘रिंगो’वर मात्र आपण फक्त एक रूपये आठ पैसे प्रति मिनिट या दराने कॉल करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here