आता अमेझॉनचा स्मार्टफोन

0

सिएटल- जगातील सर्वात मोठी ‘ई-कॉमर्स’ कंपनी म्हणून विख्यात असणार्‍या अमेझॉनने आज बाजारपेठेत आपला ‘फायर’ हा स्मार्टफोन उतारण्याची घोषणा केली आहे. यात चक्क पाच कॅमेरे असून याच डिस्प्ले थ्री-डी आहे.

अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी काही दिवसांपुर्वीच बाजारपेठेत अभिनव प्रॉडक्ट लॉंच करत असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात कंपनीतर्फे एक व्हिडीओदेखील जारी करण्यात आला होता. दरम्यान, आज जेफ बेझोस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. याचे नाव ‘फायरफोन’ असून तो २५ जुलैपासून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. याच्या ३२ जीबी मॉडेलचे मुल्य १९९ तर ६४ जीबीचे मुल्य २९९ डॉलर्स इतके ठेवण्यात आले आहे. अनलॉक केलेला फायरफोन हा अमेझॉनच्या वेबसाईटवरून ६४९ डॉलर्सला उपलब्ध होणार आहे.

या फोनचा थ्री-डी स्क्रीन ४.७ इंच इतका असून अड्रेनो ३३९ प्रोसेसर आहे. महत्वाची बाब म्हणजे दोन जीबी रॅम असणार्‍या या फोनसाठी अमेझॉनने आपली ‘फायर ओएस’ ही ऑपरेटींग सिस्टिम वापरली आहे. यामुळे आता ही ऑपरेटींग सिस्टिम अँड्रॉइड आणि ऍपल ओएसला स्पर्धा देण्यासाठी समोर येणार आहे. या फोनमध्ये पाच कॅमेर्‍यांची सुविधा आहे.

जगभरातील स्मार्टफोनच्या निर्मितीत ऍपल आणि सॅमसंग आघाडीवर आहेत. तर ऑपरेटींग सिस्टिममध्ये अँड्रॉइड आघाडीवर आहे. मात्र अमेझॉनने एकाच फटक्यात हँडसेट आणि ऑपरेटींग सिस्टिममध्ये दमदार पदार्पण करून धमाल उडवून दिली आहे.

amazon smart phone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here