आता ट्विटरवर २४ तासांनी आपोआप नष्ट होणारे ट्विटस्

0

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी २४ तासांनी गायब होणारे ट्विट करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली असून याचे नाव फ्लिट असणार आहे.

स्नॅपचॅटवरील स्टोरीज हे फिचर अनेक सोशल मीडिया मंचावरून वापरले जात आहे. फेसबुकने स्टोरीजच्या माध्यमातून याची उचलेगिरी केली. यासोबत इन्स्टाग्रामवरही स्टोरी हे फिचर आले. तर व्हाटसअ‍ॅपवर स्टेटसच्या माध्यमातून २४ तासांनी आपोआप नष्ट होणारी प्रतिमा, शब्द अथवा व्हिडीओ वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. या तिन्ही सेवांचे युजर्स विपुल प्रमाणात याचा वापर करत आहेत. आता ट्विटरदेखील स्टोरीज या फिचरची नक्कल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी फ्लिटस् हे नवीन फिचर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कायवोन बेकपोर यांनी एका ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. फ्लिटस् हे ट्विटच असणार आहे. तथापि, याला रिट्विट, लाईक अथवा रिप्लाय आदी करता येणार नाहीत. तर याला थेट डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून दुसरा युजर रिअ‍ॅक्ट करू शकेल. तसेच फ्लिटस् हे ट्विट युजरच्या टाईमलाईनमध्ये दिसणार नसून याला युजरच्या अवतारवर क्लिक करून पाहता येणार आहे. हे ट्विट बरोबर २४ तासांनी आपोआप नष्ट होणार असल्याची माहिती कायवोन बेकपोर यांनी दिली आहे. पहिल्यांदा हे फिचर ब्राझीलमध्ये प्रदान करण्यात आले असून लवकरच भारतासह अन्य देशांमधील युजर्स याला वापरू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here