आता नवीन रंगाच्या पर्यायात मिळणार रेडमी नोट ५ प्रो !

0
शाओमी रेडमी नोट ५ प्रो, xiaomi redmi note 5 pro

शाओमी कंपनीने आपला रेडमी नोट ५ प्रो हा स्मार्टफोन आता नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात आज बाजारपेठेत सादर केला आहे.

किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम दर्जेदार स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी ख्यात असणार्‍या शाओमीने या वर्षाच्या प्रारंभी रेडमी नोट ५ प्रो हे मॉडेल लाँच केले होते. याला आधी ब्लॅक, ब्ल्यू, गोल्ड आणि रोझ गोल्ड या रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले होते. आज याला लाल रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले आहे. आजपासून ग्राहक याला मी.कॉम या संकेतस्थळावरून खरेदी करू शकतो.

शाओमी रेडमी नोट ५ प्रो या मॉडलमध्ये ५.९९ इंच आाकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर दिलेला आहे. याला ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायात सादर करण्यात आले होते. तथापि, लाल रंगाची आवृत्ती ही ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटसाठी सादर करण्यात आली असून याचे मूल्य १४,९९९ रूपये इतके आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस १२ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले असून पुढील बाजूस २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश आणि ब्युटिफाय ४.० हे विशेष फिचर्स दिलेले आहेत. यातही ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here