आता मराठीसाठी अ‍ॅमेझॉनच्या किंडल डायरेक्ट पब्लिशिंगची सुविधा

0
अ‍ॅमेझॉन किंडल डायरेक्ट पब्लिशिंग,amazon-kindle-direct-publishing

अमेझॉनची किंडल डायरेक्ट पब्लिशिंग ही सुविधा आता मराठीसह अन्य पाच भारतीय भाषांसाठी आता उपलब्ध करण्यात आली आहे.

अमेझॉनच्या किंडल डायरेक्ट पब्लीशींगच्या मदतीने आता लेखकांना आपली हिंदी, मराठी, गुजराती आणि मल्याळम भाषेतील ई-पुस्तके स्वत: प्रकाशित करून भारत व जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार आहेत. ही विनामूल्य सेवा लेखकांना वेगाने बाजारपेठेपर्यंत पोहोचववण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे पुस्तकाच्या मालकीवरील हक्क अबाधित राखण्यास मदत होणार आहे. यासोबत ई-पुस्तकांच्या विक्रीवर ७० टक्क्यांपर्यंतच रॉयल्टी मिळवून देतानाच आपल्या पुस्तकाची किंमत आपणहून ठरविण्याची मोकळीकही या प्रणालीमध्ये देण्यात आलेली आहे.

भारतातील इंग्रजी लेखकांसाठी ही सुविधा २०१२ सालीच सादर करण्यात आली आहे. आज हजारो लेखक या सेवेचा फायदा घेत आहेत. आज सर्वाधिक खपाच्या १०० ई-पुस्तकांपैकी जवळ-जवळ २० टक्के पुस्तके ही केडीपीच्या माध्यमातून प्रकाशित झालेली आहेत. आपले ई-पुस्तक प्रकाशित करण्यासाठी लेखकांनी फक्त https://kdp.amazon.com या संकेतस्थळावर जाऊन आपले लिखाण तिथे अपलोड करण्याची गरज असते. एकदा का हे पुस्तक प्रकाशित झाले की किंडल ई-रीडर्स किंवा किंडल अ‍ॅप अशा सर्व ठिकाणी ते डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते. किंडल अनलिमिटेड ही योजना वाचकांना लक्षावधी किंडल ई-पुस्तकांपैकी हवी तेवढी पुस्तके वाचण्याची मुभा देते. अ‍ॅमेझॉनने या योजनेमध्येही भारतीय भाषांतील पुस्तके समाविष्ट केली आहेत. ही योजना प्रति महिना १५० रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.

दरम्यान, यात आता मराठीसह पाच भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भात भारतातील किंडल कन्टेट विभागाचे संचालक संजीव झा म्हणाले की, आता केडीपीमध्येही भारतीय भाषांची भर पडल्याने आम्ही वाचकांना पुस्तकांचा अधिक मोठा संग्रह उपलब्ध करून देऊ शकू. भारतीय भाषांतील लेखकांचे काम कोट्यवधी भारतीय आणि जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही उत्सुक आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here