आता हप्त्यांनी करा दागिन्यांची खरेदी !

0
zaverimart

ऑनलाईन पध्दतीने दागिन्यांची निवड करून ते संबंधीत ज्वेलर्सकडे जाऊन ईएमएआयच्या माध्यमातून खरेदी करण्याची सुविधा ‘झवेरीमार्ट.कॉम’ या स्टार्टपने करून दिली असून याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. यात पारंपरिक आणि डिजीटल या दोन्ही पध्दतींचा अफलातून संगम करण्यात आला आहे.

अनोखी प्रणाली

सध्या आपल्याला आभूषणे खरेदी करावयाचे असल्यास ज्वेलर्सच्या शोरूममध्ये जाऊन आपल्याला हव्या त्या दागिन्यांची निवड करावी लागते. यात आपणास हवे ते डिझाईन न मिळाल्यास दोन-तीन चकरा माराव्या लागातत. नेमकी हीच समस्या लक्षात घेत पुणे येथील सागर जैन यांनी ‘झवेरीमार्ट.कॉम’ हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. यात कुणीही स्थानिक ज्वेलर्सकडे उपलब्ध असणार्‍या उत्पादनांमधून आपल्याला हव्या त्या डिझाईनमधील आभूषण निवडू शकतो. यानंतर संबंधीत प्रॉडक्ट हे ऑनलाईन अथवा ऑफलाईन या दोन्ही पध्दतींनी खरेदी करता येते. म्हणजे कुणीही याची ऑनलाईन ऑर्डरदेखील देऊ शकतो. अन्यथा आपल्या फुर्सतीच्या वेळेत संबंधीत स्टोअरमध्ये जाऊन याला खरेदी करता येते. या माध्यमातून हॉलमार्कयुक्त उत्पादने विकली जातात. मोडसह अन्य बाबींमध्ये संबंधीत ज्वेलरकडे असणारे नियम या व्यवहाराला लागू करण्यात आले आहेत.

ऑनलाईन अथवा ऑफलाईनचा संगम

‘झवेरीमार्ट’वरील खरेदीमुळे ग्राहकांना विविध पध्दतीने लाभ होऊ शकतो. एक तर यामुळे अनेक दुकानांमध्ये जाण्याचा त्रास वाचतो. याचसोबत ग्राहकाला अनेक पर्यायांमधून हवे ते प्रॉडक्ट अगदी अचूकपणे आणि तेदेखील अन्य दुकानांमधील दरांची तुलना करून खरेदी करता येते. ‘झवेरीमार्ट’साठी ‘सिलेक्ट ऑनलाईन, परचेस इनस्टोअर’ ही ई-कॉमर्सची प्रणाली वापरण्यात आली आहे. टाटा कंपनीने अलीकडेच ‘टाटाक्लिक’ हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने खरेदीची सुविधा देण्यात आली आहे. देशातील हे प्रथम पारंपरिक (फिजीकल) आणि नव्या (डिजीटल) माध्यमांचा संगम असणारे ‘फिजीटल मॉडेल’ असल्याचे मानले जात होते. या पार्श्‍वभुमिवर, ‘झवेरीमार्ट.कॉम’ या पोर्टलनेही याच पध्दतीने ‘फिजीटल’ प्रणालीचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे.

या ज्वेलर्सच्या दुकानातून करा खरेदी

‘झवेरीमार्ट.कॉम’च्या माध्यमातून सध्या पुण्यातल्या रस्ता पेठेतील एमबी अष्टेकर ज्वेलर्स, एमजी रोडवरील नानासाहेब विठ्ठल शामशेठ ज्वेलर्स, कर्वे रोडवरील सीजी अष्टेकर ज्वेलर्स, निगडीतील सत्यम ज्वेलर्स, मुकुंदनगर भागातील शांती ज्वेलर्स, चिंचवडमधील दिलीप सोनिगरा आणि सोनिगरा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या आभूषणांच्या शोरूममधून कुणीही ग्राहक खरेदी करू शकेल.

चक्क हप्त्याने दागिन्यांची खरेदी

‘झवेरीमार्ट.कॉम’ची खासियत म्हणजे या पोर्टलवरून ऑर्डर देऊन कुणीही ईएमआय अर्थात मासिक सुलभ हप्त्यांनी दागिने खरेदी करू शकणार आहे. या अंतर्गत सहा ते नऊ महिन्यांपर्यंत परतफेड करण्याचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. १५,००१ ते एक लाख रूपयांपर्यंतच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी ही सुविधा सादर करण्यात आली आहे. ‘झवेरीमार्ट.कॉम’ने यासाठी ‘फास्टबँकिंग’ या कंपनीशी सहकार्याचा करार केला आहे. सध्या पुण्यातील ग्राहकांनाच ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here