आयडियाचे दोन स्मार्टफोन

0

देशातील मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी आयडियातर्फे ग्राहकांसाठी किफायतशीर दरात दोन थ्री-जी स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत.

आयडिया ही देशातील तिसर्‍या क्रमांकाची मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी आहे. सध्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करण्यात येतो. आयडियातर्फे ग्राहकांसाठी उत्तम इंटरनेट पॅकेजेस उपलब्ध करण्यात आलेली आहेत. या पार्श्‍वभुमीवर कंपनीतर्फे आयडिया अल्ट्रा प्लस आणि आयडिया idea_phoneफॅब हे दोन स्मार्टफोन लॉंच करण्यात आले आहेत. यातील आयडिया अल्ट्रा प्लस हा ८,३०० रूपये मुल्य असणारा स्मार्टफोन अनेक उत्तम फिचर्सनी सज्ज आहे. यात १.३ गेगाहर्टझ प्रोसेसर आणि एक जीबी रॅम देण्यात आली आहे. पाच इंच हाय डेफिनेशन डिस्प्लेच्या मदतीने व्हिडीओ स्ट्रीमिंग वा गेमिंग उत्तमरित्या करता येते. यात आठ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला असून याच्या बॅटरीची क्षमता २००० मिलीअँपीअर इतकी आहे.

आयडिया फॅब हा एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन असून याचे मुल्स ४,९९९ रूपये इतके ठेवण्यात आले आहे. यात १.२ गेगाहर्टझचा प्रोसेसर, बिल्ट इन सोशल नेटवर्कींग ऍप, जीपीएस, थ्री-जी कनेक्टीव्हिटी, गोरिला ग्लास डिस्प्ले आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोन सोबत कंपनीने १.६ जीबी थ्री-जी इंटरनेट डाटा तीन महिन्यापर्यंत मोफत दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here