आयफोनवर बायबॅक ऑफर

0

स्नॅपडीलवरून आयफोन खरेदी केल्यास सहा महिन्याच्या आता निम्म्या रकमेत त्याला परत खरेदी करण्याची (बायबॅक) ऑफर आता जाहीर करण्यात आली आहे.

अलीकडेच लॉंच करण्यात आलेले आयफोन सिक्स एस आणि सिक्स एस प्लस हे भारतातही चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. आता दिवाळीच्या पार्श्‍वभुमिवर स्नॅपडील कंपनीने आयफोन खरेदीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे.

या अंतर्गत कुणीही स्नॅपडीलवरून आयफोन खरेदी केल्यास हेच पोर्टल याला बायबॅक करणार असल्याची ऑफर लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत आता सहा महिन्याच्या आता कोणताही आयफोन निम्म्या रकमेत तर १५ महिन्यांच्या आत ४० टक्के रकमेत ग्राहक परत करू शकणार आहे. अर्थात यासाठी अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ग्राहकाने त्याने स्नॅपडीलवरून घेतलेल्या ऍसेसरीजसह तो परत करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे यात कोणत्याही प्रकारची खराबी झालेली नसावी. भारतात आयफोनवर अशा स्वरूपाची ऑफर प्रथमच प्रदान करण्यात आली आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here