आयफोन, आयपॅडमध्ये वायरलेस चार्जिंग

0

अॅपल कंपनी आपल्या आयफोन आणि आयपॅड या उपकरणांमध्ये लवकरच वायरलेस चार्जिंगची सुविधा प्रदान करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

काही उच्च श्रेणीतल्या स्मार्टफोन्समध्ये वायरलेस चार्जिंगचे फिचर देण्यात आलेले आहे. यात सॅमसंग गॅलेक्सी एस ६, गुगल नेक्सस ५ आदींचा समोवेश आहे. अलीकडच्या काळात अनेक चिनी कंपन्यांनीदेखील ही सुविधा प्रदान केली आहे. या पार्श्‍वभुमिवर आता अॅपलदेखील आपल्या उपकरणांमध्ये हे तंत्रज्ञान देणार असल्याचे वृत्त ‘ब्ल्युमबर्ग’ने दिले आहे. खरं तर या कंपनीने २०१० सालीच वायरलेस चार्जिंगच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्‍वभुमिवर पुढील वर्षी येणारे आयफोन आणि आयपॅड या तंत्रज्ञानाने युक्त असतील असे मानले जात आहे. सद्यस्थितीत प्रदान करण्यात येणार्‍या वायरलेस चार्जिंगला बर्‍याच प्रमाणात मर्यादा आहेत. मात्र यात सुधारणा केल्यानंतरच ऍपल याचा अवलंब करणार असल्याचेदेखील समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here