आयव्हुमीचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

0
Ivoomi-Iv505-Pre-Launch

आयव्हुमी या चिनी कंपनीने भारतात आपल्या आयव्हुमी आयव्ही५०५ या फोर-जी मॉडेलच्या माध्यमातून प्रवेश केला असून याचे मूल्य अवघे ३,९९९ रूपये आहे.

आयव्हुमी आयव्ही५०५ या मॉडेलमध्ये पाच इंच आकाराचा आणि ९६० बाय ५४० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे आहे. वर नमूद केल्यानुसार यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा सपोर्ट असल्याने यात रिलायन्स जिओ सेवेचे सीमकार्ड चालू शकेल. हे मॉडेल शॉपक्लुज या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here