आला जिओनी मॅरेथॉन एम 5 प्लस

0
gionee_marathon_m5_plus

जिओनी कंपनीने भारतात एम 5 प्लस हा जंबो बॅटरी असणारा स्मार्टफोन अधिकृतरित्या लाँच केला आहे.

गत डिसेंबर महिन्यात जिओनी एम 5 प्लस हा स्मार्टफोन चीनमध्ये 2,499 युआन अर्थात सुमारे 25567 रूपयात लाँच करण्यात आला होता. अलीकडच्या काळात हे मॉडेल भारतात सादर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर हा स्मार्टफोन 26,999 रूपये या मुल्यात भारतात मिळणार आहे.

जिओनी मॅरेथॉन एम 5 प्लस या मॉडेलमध्ये सहा इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटी 6753 प्रोसेसरने युक्त असणार्‍या या मॉडेलची रॅम 3 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी इतके असणार आहे. अँड्रॉईडच्या 5.1 लॉलिपॉप प्रणालीवर चालणार्‍या या मॉडेलमध्ये अमिगो 3.0 हा इंटरफेस देण्यात आला आहे. यात 5040 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या मदतीने तब्बल 34.5 दिवसांचा स्टँडबाय टाईम शक्य असल्याचा कंपनीचा दावा आहे. यातील कॅमेरे हे 13 आणि 5 मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. फोर-जी सपोर्ट आणि ड्युअल सीमकार्डयुक्त या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, युएसबी टाईप-सी पोर्ट आदी फिचर्स देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here