गेल्या अनेक दिवसांपासून कारप्रेमींच्या औत्सुक्याचा केंद्रबिंदू बनलेले केयुव्ही १०० हे मॉडेल आज डिझेल आणि पेट्रोलच्या चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आहे.
महिंद्राच्या एक्सयुव्ही ५०० या एसयुव्ही मॉडेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. याच्या धरतीवर थोड्या कमी किंमतीत केयुव्ही १०० ही कार लॉंच करण्यात आली आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे ते दिसायला अत्यंत आकर्षक आहे. याचसोबत यात अनेक उपयुक्त फिचर्ससह सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. याचे केटू, केफोर, केसिक्स आणि केएट हे चार व्हेरियंटस ४.४२ ते ६.७६ लाख (पुण्यातील एक्स शोरूम मुल्य) या किंमतपट्टयात सादर करण्यात आले आहे. यात १.२ लिटरचे एम फाल्कन जी८० हे पेट्रोल तर १.२ लिटरचेच एम फाल्कन डी ७५ इंजिन दिलेले आहे. याला उत्तम प्रतिचे टेल लँप तसेच समोर फॉग लँप दिलेले आहेत. दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी बंपर दिलेले आहे. तसेच यात प्रवास करणार्यांसाठी ड्युअल एअरबॅग्जची सुरक्षादेखील प्रदान करण्यात आली आहे.
महिंद्रा केयुव्ही १०० मध्ये ३.५ इंच आकारचा डिस्प्ले असणारी ‘इन्फोटेनमेंट’ प्रणाली देण्यात आली आहे. यात इनबिल्ट ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टिम, ब्ल्यु-टुथ ऑडिओ, हँड-फ्री कॉल, चार स्पीकर-दोन ट्युटर आदींचा समावेश आहे. महिंद्राच्या ब्ल्युसेन्स या ऍपला याची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. मारूतीचे स्विफ्ट तर हुंदाईचे आय टेन या मॉडेल्सचा केयुव्ही १०० आव्हान देण्याची शक्यता आहे.