आलेत सॅमसंगचे दोन स्मार्टफोन

0

सॅमसंग कंपनीने भारतीय बाजारपेठेत जे-फाईव्ह आणि जे-सेव्हन हे दोन फोर-जी स्मार्टफोन लॉंच केले आहेत. यात सेल्फी फोटोग्राफीची खास सुविधा देण्यात आली आहे.

Samsung-J5-J7-devices

जे-फाईव्हच्या फिचर्सचा विचार केला असता यात पाच इंच आकारमानाचा १२८०*७२० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.२ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसर आहे. याची रॅम १.५ जीबी तर इंटरनल स्टोअरेज आठ जीबी इतके आहे. ते मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. ड्युअल सीमकार्डची सुविधा असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या ५.० अर्थात लॉलिपॉप व्हर्शनवर चालतो. याचा मुख्य कॅमेरा १३ तर समोरील कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यात ऑटो-फोकसची सुविधा असल्यामुळे सेल्फी फोटो उत्तम प्रतिचे येतात असा कंपनीचा दावा आहे. याची बॅटरी २६०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तसेच याच फोर-जी, थ्री-जी, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, एनएफसी, जीपीएस, मायक्रो युएसबी आदी पर्याय आहेत. हा स्मार्टफोन ११,९९९ रूपयांना सादर करण्यात आला आहे.

जे-सेव्हन मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा १२८०*७२० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.५ गेगाहर्टझ ऑक्टॉ-कोअर ऍक्झीनॉक्स ७५८० प्रोसेसर आहे. याची रॅम १.५ जीबी तर इंटरनल स्टोअरेज आठ जीबी इतके आहे. ते मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. ड्युअल सीमकार्डची सुविधा असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या ५.० अर्थात लॉलिपॉप व्हर्शनवर चालतो. जे-फाईव्ह प्रमाणेच याचा मुख्य कॅमेरा १३ तर समोरील कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यातही ऑटो-फोकसची सुविधा आहे. याची बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तसेच याच फोर-जी, थ्री-जी, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, एनएफसी, जीपीएस, मायक्रो युएसबी आदी पर्याय आहेत. हा स्मार्टफोन १४,९९९ रूपयांना सादर करण्यात आला आहे. जे-फाईव्ह आणि जे-सेव्हन हे दोन्ही स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार असून याची नोंदणी सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here