आलेय अॅपल वॉच !

0

अॅपल या कंपनीचे बहुप्रतिक्षीत स्मार्ट वॉच अखेर सादर करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यात फॅशन आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम करण्यात आलेला आहे.

apple_watch

अॅपल कंपनीने गेल्या वर्षीच आपण स्मार्ट वॉच सादर करणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासूनच या स्मार्टवॉचविषयी प्रचंड कुतुहल तयार झाले होते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हे सानफ्रान्सिस्को येथे हे वॉच सादर केले. विशेष म्हणजे प्राथमिक ते उच्च श्रेणीत या स्मार्टवॉचचे मॉडेल्स असणार आहेत. ३४९ ते ३९९ डॉलर्समध्ये याचे एंट्री लेव्हल मॉडेल असेल. हे स्मार्टवॉच ३८ ते ४२ मीमी या आकारमानात असणार आहे. मध्यम श्रेणीतील स्मार्टवॉच हे ५४९ ते १०४९ डॉलर्स इतक्या किंमतपट्टयात उपलब्ध करण्यात आले आहे. तर उच्च श्रेणीतील स्मार्ट वॉच तब्बल दहा हजार डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीत सादर करण्यात आले आहे. १० एप्रिलपासून याची नोंदणी करण्यात येणार असून ते ग्राहकांना २४ एप्रिलपासून मिळणार असल्याची माहिती टिम कुक यांनी दिली. यात उत्तमोत्तम फिचर्स तर आहेच पण याचा लुकदेखील मनाला भावणारा आहे.

अॅपलच्या स्मार्टवॉचमध्ये कॉल करणे वा रिसिव्ह करणे, ई-मेल, वेब सर्फींग, वायरलेस पेमेंट, एक्सरसाईज ट्रॅकींग आदी फिचर्स आहेत. ते आयफोन वा आयपॅडशी ब्ल्यु-टुथ व वायफायच्या मदतीने जोडता येणे शक्य आहे. विशेष बाब म्हणजे आयफोनप्रमाणे यावर थर्ड पार्टी अॅप्लीकेशन्स वापरता येणार आहेत. याची बॅटरी एका चार्जिंगमध्ये तब्बल १८ तासापर्यंत वापरता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा लुकदेखील अतिशय उत्तम असाच आहे.

अॅपलचे हे स्मार्ट वॉच लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. मात्र कुणीही एक हजार डॉलसपर्यंत खर्च करून याला खरेदी करू शकते. मात्र सोन्याने मढविलेल्या व दहा ते १७ हजार डॉलर्स इतक्या किमतीचे घड्याळ कोण घेणार हा प्रश्‍नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here