इंटेक्सचा अँड्रॉइड गो प्रणालीवरील स्मार्टफोन सादर

0
अँड्रॉइड गो प्रणालीवरील इंटेक्स इन्फी ३, intex infi 3 with android go system

इंटेक्सने अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणारा इन्फी ३ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

गुगलने किफायतशीर स्मार्टफोनवर अँड्रॉइडची अद्ययावत आवृत्ती वापरण्यासाठी अँड्रॉइड गो या नावाने स्वतंत्र प्रणाली सादर केली आहे. अर्थात यामुळे एंट्री लेव्हलच्या स्मार्टफोनमध्येही अँड्रॉइडच्या ताज्या आवृत्तीचा वापर करता येणार आहे. भारतासारख्या बाजारपेठेत बहुतांश स्मार्टफोन हे एंट्री लेव्हलचे विकले जात असतात. या पार्श्‍वभूमिवर, अँड्रॉइड गो प्रणाली भारतीय ग्राहकांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत इन्फी ३ हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. यात हीच प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. हा अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारा इंटेक्सचा पहिला स्मार्टफोन ठरला आहे. याचे मूल्य ४,६४९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

इंटेक्सच्या इन्फी ३ या मॉडेलमध्ये १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा, फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ४.९५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए प्लस क्षमतेचा असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

इन्फी ३ या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला आहे. याच्याच मदतीने या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यातील बॅटरी २,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ९ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन गोल्ड, लाईट आणि ब्ल्यू या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here