इंटेक्स अॅक्वा एयर @ ४,६९०

0

इंटेक्स कंपनीने भारतात अॅक्वा एयर हा बजेट स्मार्टफोन अवघ्या ४,६९० रूपयांना लॉंच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

इंटेक्स कंपनीने या महिन्याच्या प्रारंभीच अॅक्वा थ्री-जी एनएस आणि ऍक्वा वेव्ह हे दोन स्मार्टफोन लॉंच केले होते. आता अॅक्वा एयर सादर करण्यात आला आहे. इंटेक्सचा हा स्मार्टफोन पाच संच आकारमानाचा आणि डब्ल्यूव्हिजीए अर्थात ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात १.२ गेगाहर्टझ ड्युअल कोअर मीडियाटेक ६५७२ डब्ल्यू एसओसी प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ५१२ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके देण्यात आले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात एलईडी फ्लॅशसह दोन मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला असून सेल्फीसाठी ०.३ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे.

इंटेक्स अॅक्वा एयर हा स्मार्टफोन टु-जी आणि थ्री-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह जीपीआरएस/एज, जीपीएस/ए-जीपीएस, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, ड्युअल सीम आदी सुविधांनी सज्ज आहे. यात २,३०० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. हा स्मार्टफोन काळा, चंदेरी आणि सोनेरी या तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर इंटक्स कंपनीचा हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या किटकॅट प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here