इंटेक्सने भारतात फोर-जी सपोर्ट आणि मार्शमॅलो प्रणालीवर चालणारा इंटेक्स अॅक्वा ७ हा स्मार्टफोन ९४९९ रूपये मुल्यात सादर केला आहे.
रोझ गोल्ड, शँपेन आणि डार्क ब्ल्यू या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळेल. यात ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून याच्या मदतीने २२ तासांपर्यंतचा बॅकअप मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची रॅम तीन जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडीच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरचे फिचरदेखील प्रदान करण्यात आले आहे. यात ५ इंच आकारमानाचा, एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. वर नमुद केल्याप्रमाणे यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट असेल. तर या ड्युअल सीम मॉडेलमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस आदी फिचर्ससह मातृभाषा, सावन, ऑपेरा मिनी, डेली हंट आणि न्यूज पॉईंट हे अॅप प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आले आहेत.