इंटेक्स कंपनीने आपला उदय हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला असून यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
इंटेक्स उदय या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल ब्लॅक, ब्ल्यू आणि शँपेन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने डाटाबॅक या फिचरच्या अंतर्गत ग्राहकाला दरमहा ५०० एमबी मोफत डाटा देण्याचे जाहीर केले आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. यामध्ये २८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.
इंटेक्स उदय या स्मार्टफोनचे मूल्य ७,९९९ रूपये आहे. तथापि, रिलायन्स जिओने जाहीर केलेल्या ऑफरमधून यावर तब्बल २२०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याच्या अंतर्गत ग्राहकाला प्रत्येकी ५० रूपयांचे ४४ व्हाऊचर्स मिळतील. यामुळे ग्राहकाला हा स्मार्टफोन ५,२९९ रूपयात पडणार आहे.