इंटेक्स स्टारी १० : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

इंटेक्स कंपनीने स्टारी १० हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन बाजारपेठेत उताराला असून यात अतिशय दणकट असा शॅटरप्रुफ डिस्प्ले देण्यात आला आहे.

अलीकडच्या काळात बर्‍याच मॉडेल्समधील डिस्प्ले हा उत्तम दर्जाचा असतो. अर्थात हे फिचर फ्लॅगशीप म्हणजेच उच्च श्रेणीतील मोबाईल्समध्ये असते. तथापि, इंटेक्सने आपल्या स्टारी १० या अत्यंत किफायतशीर दराच्या हँडसेटमध्येही याच स्वरूपाची सुविधा दिली आहे. म्हणजेच यातील ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले हा शॅटरप्रूफ या प्रकारातील आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात मुख्य कॅमेरा १३ ते फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा देण्यात आला आहे. यातील बॅटरी २,८०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.

इंटेक्स स्टारी १० हा स्मार्टफोन ग्राहकांना स्नॅपडील या शॉपींग पोर्टलवरून ५,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्ल्यू, शँपेन गोल्ड आणि ग्लॉसी ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. याला जिओच्या कॅशबॅक ऑफरसोबत सादर करण्यात आले असल्यामुळे ग्राहकाला एकूण २२०० रूपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here