इनफोकस एम ५३५ @ ९,९९९

0

इनफोकस कंपनीने भारतात पुर्णपणे मेटॅलिक बॉडी असणारे आपले एम ५३५ हे मॉडेल सादर केले आहे.

इनफोकस कंपनीने एम ५३० या मॉडेलनंतर एम ५३५ हा स्मार्टफोन सादर केला आहे. याची खासियत म्हणजे याची पुर्ण बॉडी ही मॅटॅलिक पध्दतीची आहे. यामुळे हा स्मार्टफोन उच्च श्रेणीतील मॉडेल्सप्रमाणे दिसतो. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० अर्थात एचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला असून यावर गोरीला ग्लास थ्रीचे आवरण आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके देण्यात आले आहे. तर यात १३ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे आहेत. इनफोकस एम ५३५मध्ये २६०० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे. यात फोर-जी आणि थ्री-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यु-टुथ आदी सुविधा दिलेल्या आहेत. सोनेरी आणि चंदेरी रंगात हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here