इनफोकस एम ८१० @ १४,९९९

0

इनफोकस या अमेरिकन कंपनीने आपला मध्यम श्रेणीतल्या किंमतपट्ट्यातील एम ८१० हा स्मार्टफोन १४,९९९ रूपयांना सादर केला आहे. अमेझॉन इंडियावर तो उद्यापासून उपलब्ध होणार आहे.

infocus_m_810

भारतात इनफोकस एम ८१० या स्मार्टफोनचे सोनेरी रंगाचे मॉडेल सादर करण्यात आले आहे. या स्मार्टफोनचा ५.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा फुल एचडी या प्रकारातील आहे. २.५ गेगाहर्टझ क्वाड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ एमएसएम९७४एसी या प्रोसेसरने युक्त असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी तर इंटरनल स्टोअरेज १६ जीबी इतके असून ते मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.

इनफोकस एम ८१० या मॉडेलमध्ये २६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. याचा एलईडी फ्लॅशसहीत असणारा मुख्य कॅमेरा १३ तर समोरच्या बाजूस असणारा कॅमेरा पाच मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. इनफोकस एम ८१० या मॉडेलमध्ये थ्री-जी, फोर-जी, जीपीआरएस/एज, वाय-फाय, ब्ल्यू-टुथ ४.०, मायक्रो युएसबी २.०, जीपीएस आदी कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. अँड्रॉईडच्या ५.० अर्थात लॉलिपॉप व्हर्शनवर चालणार्‍या या स्मार्टफोनचे मुल्य १४,९९९ रूपये इतके आहे. हे मॉडेल ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपिंग पोर्टलवर दि. १५ जुलैपासून उपलब्ध होत आहे.

इनफोकस एम ८१० हा मध्यम किंमत पट्ट्यातील स्मार्टफोन शिओमी एमआय फोर, आसुस झेनफोन टू व लिनोव्हो व्हाईब एक्स-टू या मॉडेल्सला कशी टक्कर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here