इन्स्टाग्रामवर वेब सर्च

0

इन्स्टाग्राम या सोशल साईटवर आता वेब सर्च करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम ही साईट फेसबुकच्या मालकीची आहे. यावर फोटो अपलोड करण्याची सुविधा आहे. साधारणत: ही साईट आजवर मोबाईललाच प्राधान्य देत होती. अलीकडच्या काळात मात्र संगणकालाही काही प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने आजपासून वेब सर्च सुविधा प्रदान करण्यात आली आहे.या माध्यमातून आपण डेस्कटॉपवरही हॅशटॅगचा उपयोग करून इस्टाग्रामवरील छायाचित्रांना शोधू शकतो.

स्मार्टफोनवर आधीच हॅश टॅगच्या माध्यमातून छायाचित्रांना सर्च करण्याची सुविधा होती. संगणकधारकांना मात्र आजवर फाइंडग्राम, ग्रामफीड आदी थर्ड पार्टी टुल्सचा वापर करावा लागत होता. परंतु आता थेट इन्स्टाग्राम साईटवरच ही सुविधा सादर करण्यात आल्याने युजर्सला लाभ होणार आहे.

Instagram

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here