एचटीसी डिझायर ७२८ जी लवकरच भारतात

0

एचटीसी कंपनीने डिझायर ७२८ जी हा स्मार्टफोन भारतात लॉंच करण्याचे संकेत दिले आहेत.

एचटीसी डिझायर ७२८ जी हा ड्युअल सीम या सुविधेने युक्त स्मार्टफोन आहे. यात दोन जीएसएम अथवा एक जीएसएम तर दुसरे सीडीएमए सीमकार्ड निवडण्याची सुविधा आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० पिक्सल्स अर्थात एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले आहे. या मॉडेलमध्ये १.३ गेगाहर्टझ ६४ बीट ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटी६७५३ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १.५ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके देण्यात आले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. या स्मार्टफोनमध्ये एचटीसी बुमसाऊंड या तंत्रज्ञानाने युक्त स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत.

एचटीसी डिझायर ७२८ जी या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅश आणि ऑटोफोकसची सुविधा असणारा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे तर सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या कॅमेर्‍यांमध्ये ‘ओआयएस’ अर्थात ‘ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन’ची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात २८०० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे. एचटीसी डिझायर ७२८ जी हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या लॉलिपॉप व्हर्शनवर चालणारा आहे. भारतात हा स्मार्टफोन अंदाजे १७,९०० रूपयांना सादर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here