एलजी कंपनीने अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी असणारा एलजी एक्स पॉवर हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.
एलजी एक्स पॉवर हे मॉडेल काळा आणि सोनेरी या दोन रंगांमध्ये मिळणार असून ते ग्राहकांना १५,९९० रूपयात खरेदी करता येईल. वर नमुद केल्यानुसार यात ४१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी ‘फास्ट चार्जिंग’ची सुविधादेखील देण्यात आली आहे. यामुळे ही बॅटरी १.८ तासात पूर्णपणे चार्ज करणे शक्य आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता यात ५.३ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे. यातील कॅमेरे १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे आहे.