एलजी जी३ आलाय !

0

एलजी कंपनीने उच्च श्रेणीतील जी३ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. १६ आणि ३२ जीबी क्षमतेमध्ये हे मॉडेल लॉंच करण्यात आले आहे.

Lg-g3

एलजी जी२ हा स्मार्टफोन जगभरातील ग्राहकांच्या पसंतीला उतरल्यानंतर या श्रेणीतील पुढच्या मॉडेलविषयी उत्सुकता लागून होती. अखेर एलजी कंपनीने हा स्मार्टफोन उपलब्ध करून दिला आहे. १६ आणि ३२ जीबी क्षमतेमध्ये हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. यात १६ जीबी मॉडेलचे मुल्य ४७,९९० तर ३२ जीबीचे ४९,९९० इतके ठेवण्यात आले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील १० टक्के हिस्सा काबीज करण्याचा आमचा प्रयत्न असून या वर्षाच्या अखेरीस हे उद्देश साध्य होणार असल्याचा दावा ‘एलजी इंडियाचे कार्यकारी संचालक सुन क्वान यांनी प्रतिपादन केले आहे.

एलजी जी ३ या मॉडेलचा ब्रँड अँबेसेडर बिग बी अमिताभ बच्चन आहे. आपल्या या नवीन मॉडेलच्या १५ हजार स्मार्टफोन्सवर महानायकाची स्वाक्षरी अंकित करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून कंपनीने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here