ऑनलाईन औषधी विक्रीचा मार्ग मोकळा होणार

0

ऑनलाईन औषधी विक्री वादाच्या भोवर्‍यात सापडलेली असतांनाच सरकारने आता कायद्याच्या चौकटीत राहून याला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

medicines

विद्यमान कायद्यानुसार किरकोळ व्याधींवरील औषधांचा अपवाद वगळता डॉक्टरांच्या चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन) शिवाय औषधीची विक्री होत नाही. यामुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन आदी ई-पोर्टलवरून काही औषधी आजवर बिनदिक्कतपणे विकल्या जात होत्या. यात प्रामुख्याने कामवर्धक गोळ्या-औषधी आदींचा समावेश होता. परिणामी मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये छापे मारून संबंधीत पोर्टल्सवर गुन्हे दाखल केले होते. यामुळे ऑनलाईन औषध विक्रीत अडचणी आल्या होत्या. आता मात्र केंद्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने कायद्यात बदल करून निवडक औषधी ऑनलाईन पध्दतीने विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

यानुसार अन्न व औषध प्रशासनाने सर्व राज्यांकडून याबाबत प्रस्ताव मागितले होते. यातील बहुतांश राज्यांनी ऑनलाईन औषधी विक्रीला काही अटी व शर्थींच्या अधीन राहून मान्यता देण्यास अनुकुलता दर्शविली आहे. याचे अध्ययन करून निर्णय घेण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका उपसमितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अहवालानंतरच हा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार ऑनलाईन औषधी विक्रीला परवानगी मिळणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here