ऑनलाईन पैसे भरा…घरपोच नवीन नोटा मिळवा !

0
tailmill_startup_cash_on_delivery

नोटाबंदीमुळे सर्वजण हैराण झालेले असतांना एका स्टार्टपने त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पैसे भरल्यानंतर संबंधीत व्यक्तीला घरपोच शंभरच्या नोटा पोहचवण्याची धमाल योजना जाहीर केली आहे.

नोटाबंदीमुळे सर्वजण किती हैराण झालेत हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. जुन्या नोटांचा बँकेत भरणा करून त्या बदलून घेण्याची मुदत तर आता संपून गेलीच आहे. तसेच भरणा करण्यासाठी फक्त या महिना अखेरपर्यंत मुदत आहे. यामुळे देशाच्या कान्याकोपर्‍यातील कोट्यवधी लोक त्रस्त झाले आहेत. नेमकी हीच समस्या लक्षात घेत नोयडा येथील ‘टेलमिल’ या स्टार्टप कंपनीने ‘कॅश ऑन डिलीव्हरी’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही योजना अगदी खरोखर ‘कॅश ऑन डिलीव्हरी’ प्रदान करणारी आहे.

‘टेलमिल’ ही कंपनी ग्राहकांना घरपोच आटा, डाळ आदी पदार्थ पोहचवण्याचे काम करते. यासोबत आता कंपनीने ग्राहकांना एखाद्या उत्पादनासोबत एक हजार रूपयापर्यंतच्या शंभरच्या (दहा) नोटा पोहचवण्याची योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत कुणीही ऑर्डर देतांना संबंधीत ऑर्डरच्या मूल्यासह अतिरिक्त एक हजार रूपये ‘टेलमिल’च्या खात्यामध्ये जमा करावयाचे आहे. यानंतर संबंधीत कंपनी त्या ग्राहकाला त्याने ऑर्डर दिलेल्या प्रॉडक्टसोबत शंभर रूपयांच्या दहा नोटा घरपोच पाठविणार आहे. सध्या तरी ही योजना नोयडा शहरापुरतीच मर्यादीत ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here