कार्बन या कंपनीने ए१ प्लस सुपर व ए५ टर्बो हे दोन अत्यंत स्वस्त स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
कार्बन ही भारतातील तिसर्या क्रमांकाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. किफायतशीर दरात चांगली फिचर्स देण्याचा या कंपनीचा प्रयत्न असतो. या पार्श्वभुमीवर कार्बनतर्फे ए१ प्लस सुपर व ए५ टर्बो हे दोन अत्यंत स्वस्त स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. ही दोन्ही एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन आहेत. यातील ३४९० रूपये मुल्य असणारा ए१प्लस सुपर हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या ४.४ किटकॅट व्हर्शनवर चालतो. यात १.३ ड्युअल कोअर प्रोसेसर लावण्यात आला आहे. यात ३२० * ४८० पिक्सल्स या आकारमानाचा डिस्प्ले असून यातील इंटरर्नल स्टोरेज ३२ जीबीबर्यंत वाढवता येणे शक्य आहे.
ए५ टर्बो हा स्मार्टफोन ४.४. किटकॅटवरच चालतो. याला ३.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १ गेगाहर्टझचा प्रोसेसर देण्यात आला असून तीन मेगा पिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात थ्री-जी कनेक्टीव्हिटीची सुविधाही आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्ल्युटुथ, जी सेन्सर आदी सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. भारतात स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जात असले तरी त्यात किंमत हाच कळीचा मुद्दा असतो. या पार्श्वभुमीवर कार्बनचे हे दोन अत्यंत किफायतशीर दरांमधील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना भावण्याची शक्यता आहे.