प्रत्येक भारतीयाला दर्जेदार इंग्लिश शिक्षण सहजसाध्य करण्यासाठी, किंग्स लर्निंग या इंग्लिश लर्निंग टेक स्टार्टअपने जिओ फोनसोबत भागीदारी केली आहे.
त्यांच्या नवीन आलेल्या इंगुरू जिओ फोन अॅपमधून काय या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणार्या या स्मार्ट फीचर फोनचा वापर करणार्या भारतीयांना सेवा दिली जाईल. जिओ फोनवर अनावरण झाल्यापासून २४ तासांच्या आत इंगुरू अॅपने १२०,००० डाऊनलोड नोंदवले आणि त्याच्या अनावरणापासून पहिल्या १८ दिवसांच्या कालावधीत दहा लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात किंग्स लर्निंगचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्शन वकील म्हणाले की, “जिओ फोनच्या अनेक वापरकर्त्यांसाठी इंगुरू हे त्यांचे पहिले मोबाइल शैक्षणिक साधन असेल आणि ते आमच्यासाठी खूप आकर्षक असेल. या भागीदारीच्या माध्यमातून किंग्स लर्निंग प्रेक्षकवर्ग तयार करत आहे आणि त्यांना शैक्षणिक फायदे देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्यावर भर देत आहे. जिओ फोन हे भारतातील लाखो लोकांसाठी एक नवीन साधन आहे आणि किंग्स लर्निंगकडून शैक्षणिक तंत्रज्ञान मिळवणार्या वापरकर्त्यांसाठी अधिक मूल्य देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’