किफायतशीर मुल्याचा पॅनासोनिक टी ३३

0

पॅनासोनिक या कंपनीने ४,४९० रूपयांत आपले टी ३३ हे नवीन मॉडेल सादर केले आहे. यात तब्बल २१ भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Panasonic-T33

भारतात एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खपतात. मात्र यात भाषेचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. अद्यापही बर्‍याच जणांना इंग्रजीतले मेन्यू समजत नसल्याने ते स्मार्टफोन्सचा परिपुर्ण वापर करू शकत नाही. या बाबीचा विचार करता अलीकडच्या काळात भारतीय भाषांमध्ये मेन्यू असणारे स्मार्टफोन्स येत आहेत. यातच पॅनासोनिक कंपनीने टी ३३ हे मॉडेल सादर केले आहे. याची खासियत म्हणजे तब्बल २१ भारतीय भाषांमध्ये यात सपोर्ट देण्यात आला आहे. परिणामी आपापल्या भाषेतून कुणीही याचा वापर करू शकतो.

फिचर्सचा विचार करता पॅनासोनिक टी ३३ हा किफायतशीर मुल्यातला स्मार्टफोन आहे. यात चार इंच आकारमानाचा ८००*४८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.२ गेगाहर्टझ क्वॉड कोअर प्रोसेसर असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम ५१२ एमबी इतकी असून चार जीबी इतके इंटरनल स्टोअरेज देण्यात आले आहे. ते मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात एलईडी लाईट फ्लॅशसह तीन मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा तर समोर ०.३ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात जीपीआरएस/एज, थ्री-जी, वाय-फाय, मायक्रो-युएसबी, जीपीएस/ए-जीपीएस आणि ब्ल्यू-टुथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. पर्ल व्हाईट आणि ड्युक ब्ल्यू या रंगांमध्ये पॅनासोनिक कंपनीचा हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here