किफायतशीर रेडमी ६ ए स्मार्टफोन दाखल

0
रेडमी ६ ए, xiaomi redmi 6 a

शाओमीने भारतीय ग्राहकांसाठी आपला रेडमी ६ ए हा एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन सादर केला असून यालादेखील दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी रेडमी ६ ही मालीका चीनमध्ये सादर केली होती. याला लवकरच भारतातही लाँच करण्यात येईल असे मानले जात होते. या अनुषंगाने आता बाजारपेठेत रेडमी ६, रेडमी ६ प्रो आणि रेडमी ६ ए हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यातील रेडमी ६ ए हे मॉडेल सर्वात किफायतशीर मूल्य असणारे असून याला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. शाओमीला एंट्री लेव्हलच्या बाजारपेठेत आजवर अतिशय जोरदार यश मिळाले आहे. यामुळे याच प्रकारातील मॉडेल सादर करून या कंपनीने पुन्हा या सेगमेंटवरील आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

शाओमी रेडमी ६ ए या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आणि १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये मीडियाटेकचा हेलीओ ए२२ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी असून स्टोअरेजसाठी १६ आणि ३२ जीबी असे पर्याय आहेत. याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यामध्ये पीडीएएफ आणि इआयएस हे फिचर्स आहेत. तर यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित पोट्रेर्र्ट मोडही दिलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर आधारित मीयुआय ९.६ वर चालणारा आहे. याला लवकरच मीयुआय १० चे अपडेटही देण्यात येणार आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. याचे २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोअरेजचे मूल्य ५,९९९ तर २ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ६,९९९ रूपये आहे. ब्लॅक, ब्ल्यू, गोल्ड आणि रोज गोल्ड या रंगाच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे. १९ सप्टेंबरपासून याला मी.कॉम आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे. दोन महिन्यानंतर या दोन्ही व्हेरियंटचे मूल्य वाढणार असल्याचे शाओमी कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here