कोणत्याही पृष्ठभागाला बनवा ‘टच स्क्रीन’ !

0

सध्या टच स्क्रीन तंत्रज्ञानाचे युग आहे. यातच आता ‘टच पिको’ या कंपनीने कोणत्याही पृष्ठभागाला टच स्क्रीनमध्ये परिवर्तीत करणारे प्रोजेक्टर तयार केले आहे.

TouchPico

स्मार्टफोन्स, टॅब्ज आदींसह अन्य उपकरणांमध्ये टच स्क्रीन या पध्दतीचा वापर करण्यात येतो. जगभरातील अब्जावधी लोकांना हे तंत्रज्ञान अत्यंत सुलभ असल्याने भावले आहे. या पार्श्‍वभुमीवर आता ‘टच पिको’ या कंपनीने नवीन प्रोजेक्टर लॉंच केले आहे. एखाद्या स्मार्टफोनच्या आकाराचे हे प्रोजेक्टर अँड्रॉईड या ऑपरेटींग सिस्टिमवर चालते. याच्या मदतीने तब्बल ८० इंचापर्यंत प्रोजेक्शन करता येते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याचा टच स्क्रीन म्हणूनही उपयोग करता येतो. यासाठी ‘स्टायलस’ हा विशिष्ट पेन वापरण्यात येतो. याच्या मदतीने आपण ‘क्लिक’ करू शकतो.

यामुळे ‘टच पिको’च्या मदतीने समजा आपण एखाद्या भिंतीवर अँड्रॉईडच्या एखाद्या गेमचे प्रोजेक्शन केले तर भिंतीवर आपण बोटांनी स्पर्श केल्यास टच स्क्रीन प्रमाणेच फंक्शन्स ऍक्टीव्हेट होतात. या प्रोजेक्टरच्या मदतीने आपण चित्रपट वा प्रेझेंटेशन पाहण्यासह गेम्सचाही आनंद लुटू शकतो. या प्रोजेक्टरचे मुल्य ३३० डॉलर्स इतके ठेवण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात ते ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here