गुगलवर पुरस्थितीची माहिती

0

गुगल आता भारतातील प्रमुख पुरग्रस्त भागांमध्ये पुरस्थितीची माहिती अलर्टसच्या स्वरूपात देणार आहे.

बहुतांश नैसर्गिक आपत्तींमध्ये गुगल मदतीस धावून येत असतो. अलीकडेच चेन्नईसह तामिळनाडूतील महापुराच्या आपत्तीत गुगलने वेळोवेळी याच स्वरूपाची मदत केली होती. आता गुगलने आपल्या युजर्ससाठी भारतातील पुरस्थितीची नियमित माहिती देण्याची घोषणा केली आहे. देशातील ज्या भागांना नियमितपणे पुराचा फटका बसतो त्याच्या माहितीचे विश्‍लेषण करून गुगल ‘रिअल टाईम’ अलर्ट जारी करणार आहे. यासाठी ‘सेंट्रल वॉटर कमिशन’शी करार करण्यात आला आहे. या अंतर्गत देशातील सर्व महत्वाच्या नद्या तसेच धरणांच्या जलपातळीची माहिती गुगलला पुरविण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून गुगल आपल्या ‘पब्लीक अलर्ट’ या संकेतस्थळासह गुगल मॅप्स, गुगल नाऊ, गुगल ऍप्स आदी विविध माध्यमातून युजर्सला ही माहिती देणार आहे. याचा उपयोग करून पुरामुळे होणार्‍या हानीत घट होणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here