गुगल डॉक्समध्ये हिंदी व्हॉईस टायपिंग

0

गुगल डॉक्समध्ये आता व्हाईस टायपिंग ही सुविधा सादर करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून कुणीही बोलून हिंदीत शब्द टाईप करता येणार आहेत.

Google-Voice-Typing

काही दिवसांपुर्वीच गुगल डॉक्समध्ये इंग्रजी व्हॉईस टायपिंग ही सुविधा सादर करण्यात आली होती. आता याला हिंदी भाषेचा सपोर्टही देण्यात आला आहे. अर्थात आता कुणीही हिंदीतून बोलल्याबरोबर ते डॉक्टमध्ये आपोआप हिंदीतूनच टाईप होणार आहे. इंग्रजी आणि हिंदीसह जगातील तब्बल ४० भाषांचा याला सपोर्ट आहे. अर्थात गुगल डॉक्सची ही नवीन सुविधा क्रांतीकारण ठरण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत डेस्कटॉपवरच क्रोममधून याचा लाभ घेता येत असला तरी लवकरच अँड्रॉईड व आयओएससह अन्य प्रणालींवरील ऍपमध्येही हिंदी टायपिंग करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here