जिओनी आणणार सर्वात पातळ स्मार्टफोन

0

जिओनी या स्मार्टफोन निर्मित करणार्‍या कंपनीने आता अवघ्या पाच मीलीमीटर जाडी असणारा स्मार्टफोन तयार केला असून तो लवकरच ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत कमी जाडी असणारे स्मार्टफोन तयार करण्याकडे कंपन्यांचा कल वाढत आहे. अगदी उच्च श्रेणीतील सॅमसंग गॅलेक्सी एस५ व आयफोन ५एस gioneeयांची जाडी अनुक्रमे ७.६ व ८.१ मीलीमीटर इतकी आहे. या पार्श्‍वभुमीवर गेल्याच महिन्यात जीओनी या चिनी कंपनीने अवघी साडेपाच मीलीमीटर जाडी असणारा ‘ईलाईफ ५.५’ हा स्मार्टफोन सादर केला होता. जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन म्हणून याच्या नावावर विक्रम नोंदला गेला होता. याआधी हा विक्रम ५.७५ मीलीमीटर जाडी असणार्‍या ‘व्हिवो एक्स३’ या स्मार्टफोनच्या नावावर होता. आता जिओनीने आपलाच विक्रम मोडीत काढून अवघी पाच मीलीमीटर जाडी असणारा स्मार्टफोन तयार केला आहे. सध्या याचे नाव जाहीर झाले नसले तरी याचे ‘जीएन९००५’ असे सांकेतिक नामकरण करण्यात आले आहे.

‘जीएन९००५’ हा स्मार्टफोन १३९.८ मीलीमीटर लांब, ६७.४ मीमी रूंद तर ५ मीमी जाड इतका आहे. यात ४.८ इंच या आकारमानाचे एचडी अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉईडच्या ४.३ जेलीबीन आपरेटींग प्रणालीवर चालणारा हा स्मार्टफोन १.२ गेगाहर्टझ क्वाड कोअर प्रोसेसरने सुसज्ज आहे. याची मेमरी एक जीबी असून स्टोरेज क्षमता १६ जीबी इतकी देण्यात आली आहे. याला मागील बाजूस आठ तर समोरून पाच मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा लावण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फोरजी नेटवर्कवर चालणारा आहे. याचे मुल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. जिओनी कंपनीतर्फे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here