जोलो इरा एचडी @ ४,७७७

0

जोलो कंपनीने भारतात इरा एचडी हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन ४,७७७ रूपये मुल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

जोलो कंपनीने जुलै महिन्यात इरा हा स्मार्टफोन सादर केला होता. यातच सुधारणा करून इरा एचडी हे मॉडेल लॉंच करण्यात आले आहे. यात पाच इंच आकारमानाचा एचडी आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम एक जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. याला थ्री-जी सपोर्ट देण्यात आलेला आहे. एनडीटिव्हीच्या गॅजेट ३६० या पोर्टलवर याची १६ नोव्हेंबरपर्यत पुर्व नोंदणी सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here