जोलो ब्लॅक थ्री-जी @ ११,९९९

0

जोलो या कंपनीने भारतात आपले ब्लॅक थ्री-जी हे तीन जीबी रॅम आणि तीन कॅमेरे असणारे मॉडेल भारतात ११,९९९ रूपयांना लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

जोलो कंपनीने आधी ब्लॅक वन एक्स या नावाने तीन जीबी रॅम असणारा स्मार्टफोन सादर केला आहे. मात्र हा स्मार्टफोन वेगळा आहे. तो फक्त स्नॅपडील या ई-पोर्टलवरून २९ डिसेंबरपासून ग्राहकांना मिळणार असून याची अगावू नोंदणी सुरू झाली आहे. नावातच नमुद केल्याप्रमाणे याची रॅम तीन जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके देण्यात आले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.

जोलो ब्लॅक थ्री-जी या मॉडेलची खासियत म्हणजे यात तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात मागील बाजूस १३ आणि २ तर समोरील बाजूस ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास थ्रीचे आवरण आहे. तर यात ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here