झोलो कंपनीने आपला इरा २ एक्स हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये ६,६६६ व ७,४९९ रूपये मुल्यात लॉंच करण्याची घोषणा केली आहे.
झोला इरा २ एक्स हे मॉडेल दोन जीबी आणि तीन जीबी रॅम या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. ९ जानेवारीपासून कुणीही हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकेल. यात पाच इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा ऑनसेल डिस्प्ले असेल. तर यात १६ जीबी स्टोअरेज देण्यात आले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात ८ आणि ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे आणि २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो प्रणालीवर चालणारे आहे.