झोलोचा पहिला विंडोज फोन

0

झोलो या भारतीय कंपनीने आपला प्रथम विंडोज फोन सादर करण्याची घोषणा केली आहे. जुलै महिन्यापासून हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

यापुर्वी मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने विंडोज ८.१ या ऑपरेटींग सिस्टिमवर चालणारे कॅनव्हास विन डब्ल्यू-१२१ हे मॉडेल सादर केले होते. यातील बहुतांश सुविधा झोलोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत. ४.७ इंच हाय डेफिनेशन (१२८०* ७२० पिक्सल्स) रिझोल्युशन असणार्‍या या फोनमध्ये एक जीबीची रॅम देण्यात आली आहे. यात अंतर्गत स्टोरेज आठ जीबी असून ते ३२ जीबीपर्यंत विस्तारणे शक्य आहे. यात मागच्या बाजूने एलइडी फ्लॅशसह आठ मेगापिक्सलचा कॅमेरा तर समोरून दोन मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याची सुविधा आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट म्हणजे याचे वजन फक्त १०० ग्रॅम इतके आहे. याचे मुल्य ११,९९९ असून आजच याची स्नॅपडीलवर बुकींग केल्यास तो फक्त ९,९९९ रूपयांत उपलब्ध होणार आहे.

xolowinq900s

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here