झोलो एरा @ ४,४४४

0

झोलो या भारतीय कंपनीने अवघ्या ४,४४४ रूपयांमध्ये एरा हा एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन सादर केल्याची घोषणा केली आहे. ९ जुलैपासून याची नोंदणी होणार आहे.

xolo-era

भारतीय बाजारपेठेत सध्या एंट्री लेव्हलला अनेक स्मार्टफोन लॉंच होत आहेत. यात आता झोलो एरा या मॉडेलची भर पडली आहे. पाच इंच आकारमान असणारा या स्मार्टफोनचे डिस्प्ले ४८०*८५४ मेगापिक्सल्स इतक्या क्षमतेचा आहे. १.२ गेगाहर्टझ क्वाड-कोअर प्रोसेसरने युक्त असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम एक जीबी असून आठ जीबी इतके इंटरनर स्टोअरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ते ३२ जीबीपर्यंत वाढविता येणे शक्य आहे. एलईडी फ्लॅशयुक्त असणारा याचा मुख्य कॅमेरा हा आठ मेगापिक्सल्सचा तर समोरील बाजूचा कॅमेरा दोन मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात २१०० मिलीअँपीअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तो अँड्रॉईडच्या किटकॅट अर्थात ४.४ व्हर्शनवर चालणारा आहे.

झोलो एरा या स्मार्टफोनमध्ये थ्री-जी, जीपीआरएस/एज, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, मायक्रो युएसबी २.०, जीपीएस आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. झोलो एरा फक्त स्नॅपडील या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ९ जुलैपासून याची नोंदणी सुरू होणार आहे. पाच हजार रूपयांच्या आत मुल्य असणार्‍या फर्स्ट जनरेशनचा मोटो-ई, हुवे ऑनर बी, मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क आदी स्मार्टफोनशी इरा झोलोस स्पर्धा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here