झोलो वन एचडीचे अनावरण

0

झोलो कंपनीने अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून ४,७७७ रूपयांत झोलो वन एचडी हे नवीन मॉडेल विक्रीसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

या कंपनीने अलीकडेच झोलो ब्लॅक या मॉडेलचे तीन जीबी रॅम असणारे मॉडेल ११,९९९ रूपयांना लॉंच केले होते. आता मात्र झोलो कंपनीने किफायतशीर दराचा मार्ग पत्करत हे नवीन मॉडेल सादर केले आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स ) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. एलईडी फ्लॅशसह यात ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. याची बॅटरी २३०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

झोलो वन एचडी या मॉडेलमध्ये थ्री-जी नेटवर्क सपोर्ट दिलेला असून याशिवाय यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स दिलेले आहेत. वर नमुद केल्याप्रमाणे हा स्मार्टफोन फक्त अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here