झोलो ८एक्स १००० आयची लिस्टींग

0

झोलो कंपनीने अत्यंत किफायतशीर दरात दोन जीबी रॅम असणारा झोलो ८एक्स १००० आय हा स्मार्टफोन आपल्या वेबसाईटवर सादर केला आहे.

झोलो ही कंपनी कमी मुल्यात उत्तम फिचर्स असणारे स्मार्टफोन लॉंच करण्यासाठी ख्यात आहे. या अनुषंगाने आता या कंपनीने आपले झोलो ८एक्स १००० आय हे नवीन मॉडेल ६,९९९ रूपयांना लॉंच केले आहे. हे मॉडेल झोलो कंपनीच्या वेबसाईटवरून उपलब्ध करण्यात आले आहे. स्नॅपडील या वेबसाईटवरही याची याच मुल्यात लिस्टींग करण्यात आली असली तरी अद्याप याला अधिकृतरित्या लॉंच करण्यात आलेले नाही. यात १.४ गेगाहर्टझ मीडियाटेक एमटी६५९२एम हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी तर १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले असून ते मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.

झोलो ८एक्स १००० आय या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरिला ग्लास थ्रीचे संरक्षक आवरण आहे. अँड्रॉईडच्या किटकॅट या प्रणालीवर हा चालत असून यावर ‘हाईव्ह’ युजर इंटरफेस देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन १९२० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. तर यातील कॅमेरे ८ आणि दोन मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here