ट्विटरवर प्रायोजित व्हिडीओज

0

ट्विटरने आता आपल्या युजर्सच्या टाईमलाईनमध्ये प्रायोजित व्हिडीओज सादर करण्याची सुविधा देणारे ‘फर्स्ट व्ह्यु’ हे फिचर सादर केले आहे.

ट्विटर सध्या अत्यंत अवघड स्थितीतून जात आहे. या मायक्रो-ब्लॉगींग साईटची प्रगती खुंटली असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम नफ्यावरदेखील झाल्यामुळे यात गुंतवणूक करणारेही निराश झाले आहेत. अलीकडेच ट्विटर बंद पडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. खरं तर ट्विटरने नवनवीन सुविधा देण्याचा मार्ग पत्करला असला तरी त्याचा फारसा लाभ होत असल्याचे दिसून येत नाही. या पार्श्‍वभुमिवर आता ट्विटरने जाहिरातदारांसाठी ‘फर्स्ट व्ह्यु’ हे फिचर सादर केले आहे. या अंतर्गत जाहिरातदार आता ट्विटरवरील युजर्सच्या टाईमलाईनमध्ये प्रायोजित व्हिडीओज दाखवू शकणार आहेत. ट्विटरने आधीच ‘प्रमोटेड ट्रेंडस’ आणि ‘प्रमोटेड मोमेंटस’ अंमलात आणले आहेत. याच्या जोडीला ‘फर्स्ट व्ह्यु’ आले आहे. सध्या तरी ही सुविधा फक्त अमेरिकेत सुरू करण्यात आली असली तरी येत्या काळात भारतासह जगातील अन्य राष्ट्रांमध्ये याला लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्विटरतर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here