डाटा आणि टॉकटाईमवर नजर ठेवणारे अॅप

0

आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणारा इंटरनेटचा डाटा आणि टॉकटाईमवर नजर ठेवण्यासाठी ‘फ्रिचार्ज’ या कंपनीने ‘ज्यूस-फोन बडी’ या नावाने अॅप तयार केले आहे.

खरं तर बहुतांश कंपन्या प्रत्येक कॉल झाल्यानंतर तसेच इंटरनेट वापराच्या सेशननंतर अनुक्रमे किती टॉकटाईम व डाटा शिल्लक आहे याची माहिती एसएमएसद्वारे देत असतो. मात्र अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. यातच हे एसएमएस पुश नोटीफिकेशन या प्रकारातील असल्याने ते एकदा पाहिल्यानंतर नष्ट होत असतात. यामुळे कोणत्याही युजरला आपल्या डाटा आणि कॉलच्या वापराची अचूक माहिती मिळत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत ‘फ्रिचार्ज’ कंपनीने ज्यूस-फोन बडी हे ऍप तयार केले आहे. या अंतर्गत हे अॅप डाटा आणि कॉलिंगविषयीचे सर्व एसएमएसचे तात्काळ आकलन करून याची नोंद ठेवते आणि ती संबंधीत स्मार्टफोनधारकाला कळवत असते. मायक्रोमॅक्स आणि शिओमी कंपनीच्या काही मॉडेल्सचा अपवाद वगळता हे अॅप सर्व कंपन्यांच्या अँड्रॉईड, आयओएस, विंडोज आदी प्रणालींवर चालणार्‍या स्मार्टफोनवर वापरता येते. तसेच ते बहुतांश मोबाईल कंपन्यांनाही सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here