ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी युक्त बजेट स्मार्टफोन

0
ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी युक्त इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ प्लस,intex aqua lions t 1 plus with dual selfie cameras

इंटेक्सचा कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांनी सज्ज असणार्‍या स्मार्टफोनला अतिशय किफायतशीर मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

सध्या ड्युअल रिअर कॅमेरे असणारे स्मार्टफोन्स अतिशय किफायतशीर दरात मिळू लागले आहेत. तथापि, त्या तुलनेत ड्युअल फ्रंट कॅमेरे असणारे हँडसेट हे थोड महाग आहेत. या पार्श्‍वभूमिवर इंटेक्सचा अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ प्लस हा याच प्रकारातील स्मार्टफोन अवघ्या ५,५६५ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. शँपेन गोल्ड, ब्लॅक आणि रॉयल रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याच्या पुढील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ८ आणि २ मेगापिक्सल्सचा समावेश आहे. यामध्ये रिअल बोके इफेक्ट, बॅकग्राऊंड चेंज, नाईट शॉट, फेस डिटेक्शन, पॅनोरामा आणि बर्स्ट मोड आदी फिचर्स देण्यात आले आहेत. अर्थात या सर्व फिचर्सचा वापर करून युजर अतिशय दर्जेदार सेल्फी घेऊ शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून यात एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस आदी फिचर्स देण्यात आले आहेत.

इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ प्लस या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लास प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर कोर्टेक्स ए७ एमपी प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिली आहे. या मॉडेलमध्ये २,४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा लॉयन्स टी १ प्लस हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. यामध्ये अमेझॉन शॉपींग, डाटाबॅक, गाना, इंटेक्स सर्व्हीसेस, न्यूज पॉइंट, क्युआर कॅमेरा, स्विफ्ट की, इंडिया गेम्झ, युसी मिनी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहे. या स्मार्टफोन मध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here