तात्काळ कर्जासाठी बजाजचे अॅप

0

बजाज फिनसर्व्ह या कंपनीने गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला तात्काळ कर्ज प्रदान करण्यासाठी ‘ईएमआय फायनान्स’ हे अॅप सादर केले आहे.

सध्या सणासुदीच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यात येते. यात अनेक जण फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन खरेदी करत असतात. यात कागदपत्रांच्या पुर्ततेपासून ते ईएमआय किती पडणार? याच्या माहितीत बराच वेळ वाया जात असतो. या पार्श्‍वभुमिवर बजाज फिनसर्व्ह कंपनीने ‘ईएमआय फायनान्स’ या नावाने स्वतंत्र अॅप सादर केले आहे.

हे अॅप कुणालाही आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करून आपल्या फेसबुक वा ट्विटर अकाऊंटने यावर लॉगीन करता येते. अगदी आपल्या आधार-कार्ड क्रमांकानेही यावर लॉगीनची व्यवस्था आहे. यावर लॉगीन केल्यानंतर तीन लाख रूपयांपर्यंतच्या कर्जाला विविध मुदतीसाठी किती ‘ईएमआय’ पडतील याच्या अचूक माहितीसह कर्ज मिळवण्याच्या सर्व पुर्तता याच्या मदतीने तात्काळ करण्यात येतात. तसेच याच्याच माध्यमातून ईएमआयचा भरणादेखील करता येतो. देशभरात गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणार्‍या तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त स्टोअर्समधून या पध्दतीने तात्काळ कर्ज मिळवून वस्तू खरेदी करता येणार आहेत. अगदी तात्काळ आणि सुलभ पध्दतीने कर्ज मिळवून देण्यासाठी हे अॅप उपयुक्त असल्याने ते लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here